Home औरंगाबाद औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जणांचे वाचले...

औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जणांचे वाचले प्राण

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0089.jpg

औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जणांचे वाचले प्राण                                                                  औरंगाबाद,(बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

औरंगाबाद जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना टळली आहे. येथील गंगापूर तालुक्यात काल रात्री एका चालत्या एसटी बसला अचानक आग लागली. मात्र एसटीच्या बस चालकाने परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. या घटनेच्या वेळी बसमध्ये एकूण 28 जण होते.

नाशिक-हिंगोली बस रविवारी रात्री नाशिकच्या आगार क्रमांक-१ मधून निघाली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बस गंगापूर तालुक्यातील धोरेगाव येथे आली असता इंजिनमधून धूर येऊ लागला. हा प्रकार पाहताच चालकाने बस थांबवली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, चालक आणि वाहकाने काळजीपूर्वक बसमधील २६ प्रवाशांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून बसपासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी गेले. यादरम्यान संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. आग एवढी भीषण होती की, पाहता पाहता आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Previous articleश्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध
Next articleवेलकम’-‘हेराफेरी’ चित्रपटाचे निर्माते ए.जी. नाडियादवाला यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here