Home औरंगाबाद औरंगाबादला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन

औरंगाबादला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0038.jpg

औरंगाबादला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी, दि.16 : राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत” मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त “प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे दि. 17 व 18 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महारोजगार मेळाव्याव्दारे बजाज ऑटो, नवभारत फर्टीलायझर, अजंता फार्मा, एनआरबी बेअरिंग्स, अजित सीडस, फोर्ब्स, धूत ट्रान्समिशन, इंडयुरंस टेक्नोलॉजी, व्हॅराक इंजिनिअरींग, देवगिरी फोर्जींग्स, रुचा इंजिनिअर्स, श्री सेवा कॉम्प्युटर्स, परम स्किल्स, नील मेटल, मराठवाडा ऑटो कॉम्पो, पिट्टी इंजिनिअरींग अशा विविध नामांकित कंपन्यांमधील विविध पदांच्या 5 हजार पेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहेत. महारोजगार मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा.
सर्वप्रथम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करणे. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या पर्यायावर क्लिक करणे. युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करणे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करणे. औरंगाबाद जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त आयोजित रोजगार मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणवर क्लिक केल्यावर मेळाव्यास उपलब्ध रिक्त पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लि करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा व Ok बटनावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल. ऑनलाईन Apply केलेल्या प्रतीसहीत मुलाखतीसाठी स्वखर्चाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे उपस्थित राहावे. जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सदर प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यास सहभाग नोंदवावा असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी केले आहे.

Previous articleवडगावच्या एकाला पाच लाखांना गंडा
Next articleस्टार्टअप’मुळे अकोल्याच्या अभियंता मित्रांची ‘उद्योग भरारी’ ३५ अवजारे विकसित करुन शेतीचा उत्पादन खर्च वाचविण्यात यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here