Home छ. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

237

आशाताई बच्छाव

1001405655.jpg

 

 

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

 

गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

 

महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभाग

 

विभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन

500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी.

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची संपूर्ण यंत्रणेचा सक्रीय सहभाग.

 

 

छत्रपती संभाजीनगर दि.11: “साहेब आमच्या प्रभाग संघासाठी कार्यालयाला जागा पाहिजे, साहेब बचत गटातून कर्ज मिळाल आणि आम्ही आमच्या व्यवसायात यशस्वी झालो, साहेब बचत गटाचे पहिले कर्ज मिळाले दुसऱ्या कर्जाच सांगा, बचत गटाला बाजारपेठ मिळवून द्या, बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा,” अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला.  विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेने यावर मार्ग काढून अडचणी सोडवू असे सांगतांना संबंधित यंत्रणांनी महिलांनी मांडलेल्या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश यावेळी दिले.

 

मराठवाडा विभागातील आठही  जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन संवाद साधला.

Previous articleजिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी
Next articleजालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.