Home नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

181

आशाताई बच्छाव

1001405510.jpg

जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार
1 हजार 207 कोटींची गुंतवणूक तर 4 हजार 32 रोजगार निर्मिती

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 11 एप्रिल :- जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून उद्योग उभारावेत, जेणेकरुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने तुलसी कम्फर्ट येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -२०२५ संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर औटी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, अग्रणी बँक व्यवस्थापक आलोकनाथ शर्मा, निर्यात सल्लागार आकाश ढगे, उद्योजक संघटनेचे शैलेष कराळे तसेच विविध शासकीय विभाग, बँकाचे प्रतिनिधी, उद्योजक, निर्यातदार, व्यापारी आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करारासोबत उद्योग क्षेत्राशी निगडित विविध विषयावर जसे निर्यात क्षेत्रातील विविध संधी, पणन, शासनाच्या विविध योजनांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

गुंतवणूक परिषदेत झालेले प्रमुख सामंजस्य करार याप्रमाणे आहेत.

एम.व्ही.के.ॲग्रो फुट प्रोडक्ट लि., रिलायन्स इंडस्ट्रिज लि., नांदेड बायो फ्युल प्रा.ली., निसर्ग जॅगरी मिल्स प्रा.ली., श्री. सुभाष शुगर प्रा.ली., गोदावरी इंजिनियरींग सोल्युशन, गोदावरी इंजिनियरिंग सोल्युशन, गोदावरी ड्रग्स लि. , माधव रिजंन्सी, एस. आर.व्ही.एनर्जी प्रा.ली., एकदंत सोया प्रा. ली.

या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, यांनी तर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राशी संबंधीत विविध बाबींचा उहापोह श्री. इंगळे यांनी केला. ही गुंतवणूक परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण , अनिल कदम तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleनांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा
Next articleविभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.