Home जालना जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव...

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर

131

आशाताई बच्छाव

1001405682.jpg

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी
आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर
महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
जालना शहरात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहर महापालिकेने जागा द्यावी व  सदरील पुतळा उभारण्यासाठी लागेल तेव्हढा आमदार निधी देणार असल्याची ग्वाही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली. तर महात्मा जोतिबा फुले यांनी 19 व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले.  त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यकाळातही नितांत आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन  जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती  11 एप्रिल 2025 रोजी  जालना शहर मनपा परिसरात   लाडुचा प्रसाद वाटून उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी उभयंते बोलत होते.
यावेळी पोलिस अधिक्षक  अजयकुमार बंन्सल, उपायुक्त प्रियंका राजपुत, श्रीमती गायकवाड, जालना शहर मनपाचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, आनंद अंभोरे, राजेश कुरलिये, अरूण वानखेडे, अभियंता सऊद, बंडु चव्हाण, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपीक सचिन मेहरा,  माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, भाऊसाहेब घुगे,  धरम इंगळे, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, दिनकर घेवंदे, योगेश रत्नपारखे, लक्ष्मण ईधाटे,गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, बाबासाहेब वानखेडे, मंजु घायाळ, वंदना खांडेभराड, पंडीतराव भुतेकर, दिपक वैद्य, संतोष जमधडे, शंकर घोडके, अमोल धानुरे, शिवकुमार राऊत, सचिन वानखेडे, कृषी अधिकारी कापसे, अमरदिप शिंदे, नितीन इंगळे, ॲड. रामेश्‍वर खांडेभराड, अमोल अंभोरे,  सुरेश रत्नपारखे,पोलिस निरीक्षक माने, कदीम जालनाचे पो.नि. माने, गणेश जाधव, कडुबा वाकीकर, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.