Home गडचिरोली आदिवासी क्षेत्रातील कूपोषण संपवण्यासाठी या क्षेत्रात आरोग्याच्या उत्तम सुविधा उभारण्याची आवश्यकता आमदार...

आदिवासी क्षेत्रातील कूपोषण संपवण्यासाठी या क्षेत्रात आरोग्याच्या उत्तम सुविधा उभारण्याची आवश्यकता आमदार डॉ देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0069.jpg

आदिवासी क्षेत्रातील कूपोषण संपवण्यासाठी या क्षेत्रात आरोग्याच्या उत्तम सुविधा उभारण्याची आवश्यकता

आमदार डॉ देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी                                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कूपोषणाने आदिवासी मुले दगावतात ही अत्यंत वेदनादायी बाब

नवसंजीवनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिक सोयी सुविधा देवुन त्यांना सेवेत कायम करा

आदिवासींच्या नावावर एनजीओ केवळ अनुदान लाटत असून त्यांचे काम शून्य असल्याचेही प्रतिपादन केले.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी भागातील कुपोषण संपलेले नाही. त्यामुळे गडचिरोली,पालघर , नंदुरबार, मेळघाट , सारख्या आदिवासी दुर्गम अती दुर्गम भागात मागील अनेक वर्षांपासून असणारे लहान मुलांचे कुपोषण संपविण्यासाठी या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा गतीने उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विधानसभेच्या चर्चेच्या वेळी केली.

यावेळी त्यांनी या आदिवासी अती दुर्गम भागामध्ये मागील अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या नवसंजीवनी च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ज्यादाचे अधिकार देऊन त्यांना सेवेत कायम करावे अशीही मागणी त्यांनी केली

विधानसभेमध्ये आदिवासी समाजाच्या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले असून देशाचा अमृत महोत्सवही साजरा करण्यात आला. माञ अजूनही आदिवासी समाजाच्या आरोग्य विषयक समस्या सुटलेल्या नाहीत आदिवासी भागातील लहान मुलांचा कुपोषणांने मृत्यू होतो हे अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले

आदिवासी समाजाच्या विकासाच्या व लहान मुलाच्या कुपोषणाच्या नावावर एन.जी.ओ. मोठ्या प्रमाणात शासनाकडून अनुदान लाटत आहेत . मात्र त्याचा लाभ एकाही आदिवासी माणसाला मिळत नाही. त्यामुळे असे अनावश्यक अनुदान बंद होणे आवश्यक आहे.

या अतिदुर्गम भागामध्ये मागील अनेक वर्षापासून नवसंजीवनी योजनेचे वैद्यकीय अधिकारी अतिशय उत्तम अशी सेवा देत आहेत खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य विषयक जनजागृती करून आरोग्य सेवा करून देत आहेत. मात्र त्यांना अतिशय कमी मानधन दिले जात आहे त्यांना मानधन वाढ नको आहे त्यांना सेवेत कायम करणे आवश्यक आहे ज्यांनी या समाजाचे सेवेसाठी काम केला आहे त्यांना खरोखरच राज्य सरकारने सेवेत कायम करून या आदिवासी भागातील आरोग्य सेवेला बळ द्यावे असे त्यांनी यावेळी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here