Home गडचिरोली !तेंदूपत्‍ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार!! !!वनमंत्री...

!तेंदूपत्‍ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार!! !!वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा.!!

129
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0066.jpg

!!तेंदूपत्‍ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार!!

!!वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा.!!                                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)      

!! या घोषणे बद्दल मा, मुख्यमंत्री , मा, उपमुख्यमंत्री ,व मा, वनमंत्री, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी मानले जाहीर आभार!!
तेंदूपत्‍त्‍यापासून वनविभागाला रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणा-या राशीमधून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्‍कम प्रोत्‍साहनार्थ मजूरी अर्थात बोनस म्‍हणून तेंदूपत्‍ता मजूरांना दिली जाते. मात्र 2022 पासून रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम ही पूर्णपणे बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला.या बद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस
वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे तमाम गडचिरोली , चंद्रपूर , भंडारा , गोंदिया जिल्ह्यातील
तेंदुपत्ता तोडाई करणाऱ्या गोरगरीब वनमजूर यांच्या वतीने जाहीर आभार मानले
दिनांक 24 ऑगस्‍ट 2022 रोजी विधान परिषदेत वि.प.स. डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्‍या लक्षवेधी सुचनेला उत्‍तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 2020 मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळालेली रक्‍कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी असल्‍यामुळे बोनस दिला गेला नाही. 2021 मध्‍ये 19.87 कोटी रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍यात आली. 2022 मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात ७२ कोटी इतकी रक्‍कम जमा झाली आहे. मात्र यापुढे या रकमेतुन प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्‍कम मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. आता जवळपास चौपट रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना मिळणार आहे.
स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमीत्‍ताने वनक्षेत्रात राहणा-या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणा-या तेंदूपत्‍ता मजूरांना आर्थिकदृष्‍टया स्‍वयंपूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने हा निर्णय घेण्‍यात येत असल्‍याचे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले 2021 चा तेंदूपत्‍ता बोनस येत्‍या दोन महिन्‍यात मजूरांना मिळेल अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.
या बद्दल समस्त गडचिरोली , चंद्रपूर , भंडारा ,गोंदिया जिल्ह्यातील तेंदुपान तोडाई करणारे वनमजूर यांच्यात खूप आनंदाचे वातावरण आहे
या निर्णयाबद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले व राज्यसरकारला धन्यवाद दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here