Home गडचिरोली नापिकीच्या भीतिने मृत्युला कवटाळलेल्या बंडू चौधरी या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसेनेचा आधार

नापिकीच्या भीतिने मृत्युला कवटाळलेल्या बंडू चौधरी या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसेनेचा आधार

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0077.jpg

नापिकीच्या भीतिने मृत्युला कवटाळलेल्या बंडू चौधरी या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसेनेचा आधार             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या वतीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

बळजबरीने कर्ज वसुलि करणाऱ्यास शिवसैनिक कोपरा पासून ढोबरा पर्यंत सोलून काढल्या शिवाय राहणार नाही

अतिवृष्टि आणि सतत्तची पुरपरिस्थिती यामुळे शेतातील धान पिक पूर्णपणे उध्वस्त झाले त्यामुळे चींतेत सापडून नापिकीच्या भीतिने गडचिरोली शहराजवळील मुड़झा येथील शेतकरी बंडू चौधरी याने आत्महत्या करून मृत्युला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली घरचा कर्ता पुरुष निघुन गेल्याने कुटुंबाची वताहात झाली सदरच्या घटनेची माहिती मुड़झा येथील शिवसैनिकानि शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांना दिली कात्रटवार यानी चौधरी कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले तशेच सेवाभाव जोपासत आर्थिक मदत दिली मुड़झा येथील शेतकरी बंडू चौधरी वय 49 यांना 5 एकर शेती असून त्यानी पैशाची जमवाजमव आणि बाँकेकडून कर्ज घेवून धानाची रोवनी केली या वर्षी धान पिक चांगले होईल अशी भोळी आशा वक्त केली परंतु निसर्गाचा कोप आणि धरणा च्या पाण्यामुळे निर्माण झालेली सतत्तची पुरपरिस्थिती यामुळे 5 एकरातील धान पिक पूर्ण पणे सडुन गेले या वर्षी धान्याचा एक दान सुध्दा हाती लागणार नाही बाँकेचे कर्ज कसे फेडनार कुटुंबाचा उदरनिर्वहा कसे करणार या चिंतेते बंडू चौधरी सापडले शेवटी त्यानी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करून मृत्युला कवटाळले शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अस्वस्थ झालेले शिवसेने सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यानी मुड़झा येथे शिवसैनिकासह जावून बंडू चौधरी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले कुटुंबाला आधार देत सेवाभाव जोपासत आर्थिक मदत देवुन सामाजिक बंधीलकीचे दर्शन घडविले शिवसेना तुमच्या पाठीशी असून शाषणाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार म्हणाले की शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे परंतु कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी उध्वस्त होतो त्यामुळे बाँकेचे कर्ज तर सोडाच कुटुंबाचा गाड़ा चालविने कठिन आहे बाँका कर्ज वसुलिसाठी शेतकऱ्यांकड़े तगादा लावतात शेतकऱ्यांची परस्थिति लक्षत घेता बाँकानी बळजबरिने कर्जवसुली करू नये या वर्षी शेतकरी आस्मानी संकट आणि दुसरीकडे सरकारचे सुलतानी संकटात सापडला आहे त्यामुळे बाँकानी कर्ज वसूली साठी जबरी करू नये कोणतीही बाँक कर्जवसुली साथी तगादा लावित असेल तर याबाबत शिवसेनेच्या कार्यल्यात येवून समस्या मांड़ावी जबरिने कर्ज वसूली करणाऱ्यास शिवसैनिक कोपरा पासून ढोबरा पर्यंत सोलुन काढल्या शिवाय राहणार नाही असेही शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार म्हणाले आत्महत्या ग्रस्त शेतकरी बंडू चौधरी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, संदीप अलबनकर, सूरज उइके, स्वप्निल खांडरे,दिलीप चनेकार, चूडाराम मुनघाते,माधव चौधरी,सुनंदा चौधरी गणेश दहलाकर, त्र्यम्बक फुलझेले,राहुल सोरते,फाल्गुन मुळे, नादकिशोर चंभारे,हरबा दाजगये, निरंजन लोहबरे, दिलीप वलादे,आशीष शेडमाके, नामदेव चौधरी, टीकाराम चौधरी,खुशल बोरकर,अनिल कोसमशेले,जालंधर चौधरी,रमाकांत चिचोलकर,अजय कांबले,अमोल चौधरी, चेतन हजारे,देवेंद मेश्राम, मंगेश गेडाम, मिठेल कुरचमी,राकेश मड़ावी,पत्रुजी चौधरी, चंद्रभान नंदेकर,रविभाऊ लेनगुरे, श्रवण गुरनुले,दिवाकर बुरांडे,अरुण बारापात्रे, प्रफुल जेंगथे,विलास नैतम, लक्ष्मीकांत गावले, अमोल कुलमेथ यांच्या सह मुडझा येथील शिवसैनिक व गावकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here