Home गडचिरोली काँग्रेसच्या वतीने उदयपूर- शिर्डी झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील निर्णयाच्या अंमलबजावणी ला सुरुवात मुबंई...

काँग्रेसच्या वतीने उदयपूर- शिर्डी झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील निर्णयाच्या अंमलबजावणी ला सुरुवात मुबंई इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0065.jpg

काँग्रेसच्या वतीने उदयपूर- शिर्डी झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील निर्णयाच्या अंमलबजावणी ला सुरुवात

मुबंई इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने उदपूर इथे झालेल्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने शिर्डी इथे झालेल्या नवसंकल्प शिबीरातील निर्णयावर महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने अंमलबजावणी करायला सुरुवात केली असून. त्या संदर्भाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मुबंई इथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर उपस्थित होते. या बैठकी दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून प्रदेश, जिल्हा व ब्लॉक स्तरावर असलेल्या पदाधिकाऱ्यास 5 वर्षांपेक्षा अधिक व एक पेक्षा अधिक पदावर कायम राहता येनार नसल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन ज्यांना  एकाच पदावर 5 वर्षे पूर्ण झाली किंवा एका पेक्षा अधिक पदांवर जे कार्यरत आहेत त्यांनी स्वइच्छेने आपल्या पदाचा राजनीमा देऊन नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे. या बैठकी दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक आढावा सारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे लवकरच नवीन मंडळ कमिट्या, बूथ कमिटया तयार करण्यात येणार असल्याचे व 4 सप्टेंबर रोजी दिल्ली ईथे काँग्रेच्या वतीने ” महागाई पे हल्ला बोल” महाऱ्याली होणार असून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्येकर्ते सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here