Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांचा संशोधन,कौशल्य विकास,कला संगम,स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक दर्जा विकसित करा. मा.खा.अशोकजी...

गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांचा संशोधन,कौशल्य विकास,कला संगम,स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक दर्जा विकसित करा. मा.खा.अशोकजी नेते

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0042.jpg

गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांचा संशोधन,कौशल्य विकास,कला संगम,स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक दर्जा विकसित करा.
मा.खा.अशोकजी नेते

अनु.जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.हर्ष जी चव्हाण यांना निवेदन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली हा आदिवासी, वनव्याप्त, अविकसित जिल्ह्य आहे. जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ हा शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ असून गडचिरोली -चंद्रपूर या जिल्ह्यांचा सुध्दा समावेशक आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जनजातीचे प्रमाण 38.17%टक्के व अनु.जातीचे प्रमाण 11.25%,टक्के आहे.या माध्यमातून विचार केल्यास अनु.जनजातीतील विद्यार्थ्यांचा संशोधन, कौशल्य विकास, कला संगम, स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक दृष्ट्या विकास होने अपेक्षित आहे.
कारण आदिवासी समाजाची आर्थिक, सामाजिक स्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच येथील परंपरा संस्कृती विकसित करण्यासाठी अनु.जनजातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा गोंडवाना विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी खा. अशोकजी नेते यांनी अनु.जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.श्री.हर्षजी चौव्हाण यांना नई दिल्ली येथे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
याप्रसंगी अनु.जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. हर्ष जी चौव्हाण, मा.खा.अशोकजीे ‌नेते.गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू मा.श्रीराम जीे. कावळे,एस.टि. मोर्चाचे अक्षयजी उईके,आदित्य चकनलवार, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here