Home गडचिरोली निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या वाघांचा बंदोबस्त तातडीनं करण्याची आवश्यकता आमदार डॉक्टर देवरावजी...

निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या वाघांचा बंदोबस्त तातडीनं करण्याची आवश्यकता आमदार डॉक्टर देवरावजी होळी

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0039.jpg

निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या वाघांचा बंदोबस्त तातडीनं करण्याची आवश्यकता

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दिभना येथील नीलकंठ मोहूर्ले यांच्या परिवारास आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सांत्वनपर भेट

आर्थिक मदत करून केले परिवाराचे सांत्वन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली गडचिरोली शहरापासूनच जवळ असलेल्या दीभना येथील नीलकंठ मोहुर्ले या शेतकऱ्याला जंगलात वाघाने ठार केल्याची घटना अत्यंत दुखद असून निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले असून त्याबाबतचे निर्देशही त्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले आहेत

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नीलकंठ मोहूर्ले परिवारातील सदस्यांची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सांत्वनपर पर भेट घेतली व त्यांना आर्थिक मदतही केली. यावेळी दिभना येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बालाजी पाटील जे जेंगठे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते

मागील वर्षी गडचिरोली तालुक्यातील जवळपास २० निष्पाप लोकांचा बळी वाघाने घेतलेला आहे. वाघाच्या भीतीने नागरिक जंगलात जाण्यासही घाबरत असून आपली शेती कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या या परिवाराला शासन स्तरावरून मिळण्यात येणारी मदत तातडीने मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच या वाघाचा बंदोबस्त करून पुढील निष्पाप लोकांचा जीव कसा वाचवता येईल यासाठीही आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी म्हटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here