Home बुलढाणा वरवट बकाल येथील अतिक्रमणधारकांचा साखळी” उपोषणाचा इशारा

वरवट बकाल येथील अतिक्रमणधारकांचा साखळी” उपोषणाचा इशारा

49
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-064457_WhatsApp.jpg

वरवट बकाल येथील अतिक्रमणधारकांचा साखळी” उपोषणाचा इशारा

स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटनेमार्फत देण्यात आले निवेदन

युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तालुक्याच्या मध्यस्थी असलेले वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अतिक्रमण धारकांन पैकी फक्त चार-पाच लोकांनाच ग्रामपंचायत वरवट बकाल यांच्याकडून नोटीसा बजावण्यात आल्या तर अतिक्रमण धारक स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे महिला अध्यक्ष बीबीया बी पिता शेख दस्तगीर यांनी आज दिनांक सहा ऑक्टोंबर 2023 रोजी तहसीलदार मार्फत तामगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे तसेच स्वातंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या निवेदन मध्ये नमूद केले आहे की
वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जवळ असलेल्या शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमण धारकांच्या वतिने स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटने मार्फत साखळी’ उपोषण दि 16/10/2023 रोजी तहसिल कार्यालयासमोर करणार- असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच ग्रामपंचायत वरवट बकाल प्रशासनाने चार ते पाच लोकानाच अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजावली आहे. वास्तविक 20 ते 25 लोकांनी अतिक्रमण, छोटेमोठे उद्योगधंदे सुरू केले आहेत.
अतिक्रमण हटविण्याबाबत फक्त चार ते पाच लोकांनाच नोटीस बजावल्याने हा एक प्रकारचा अन्याय ग्रामपंचायत कडून झाला आहे. परंतु सोनाळा रोड ते वरवट बकाल गावामध्ये जाणाऱ्या रोड पर्यंतअतिक्रमण केलेले आहे. त्यांचा कायं.? असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्या अतिक्रमणधारकांना नोटीस न ,देता एकप्रकारचे अभय”दिले आहे. आम्हा ४ ते ५ लोकांना नोटीस देवून आमचे कुंटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे भारतीय राज्य घटनेने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना केवळ 4 से 5 लोकांना ग्रामपंचात ने नोटीस देवून काही लोकांच्या अतिक्रमणाला संरक्षण देणे हे कायदेशीर होणार नाही अतिक्रमण हटवायचे असल्यास संपूर्ण- वरवट बकाल मधील सर्व्हे करून अतिक्रमण हटवावे ते सर्वाचे, सोईचे होईल. तसे न, झाल्यास या न्याय’प्रश्नासाठी आम्ही साखळी उपोषण करणार असून याची दखल संबंधीत प्रशासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले असून निवेदनाच्या प्रतिलिपी – जिल्हाधिकारी बुढडाणा, जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा ,प्रशासक कृ. उ. बा. समिती वरवट बकाल, सचिव ग्रा.पं. वरवट बकाल यांना पाठविल्या आहेत. निवेदनावर अतिक्रमणधारक, बिबियाबी पिता शेख दस्तगीर, महीला स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना शहर अध्यक्ष, सदानंद गवादे अरुणा हातेकर, आशिष बकाल, गजानन इंगळे, सोनू बकाल,शेख कबिर शेख शब्बीर, यांच्या सहया आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here