Home पुणे अग्रसेन महाराज यांची जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी

अग्रसेन महाराज यांची जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी

112

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0038.jpg

अग्रसेन महाराज यांची जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी

खडकी : प्रतिनिधी उमेश पाटील
अग्रसेन महाराज यांची जयंती आगरवाल समाज खडकी येथे मोठय़ा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. कार्यक्रमामध्ये उषा तुलस्यीनजी यांनी माता की चौकी या भक्तिमय कार्यक्रमाने सर्वांचे मन भक्तिरसात न्हाऊन गेले.
अग्रसेन महाराज यांच्या जयंती निमित्ताने सुधीर अग्रवाल यानी अग्रसेन महाराज तसेच माधवी मातांसोबत १८ पुत्र आणी पुत्रवधु तसेच गर्ग ऋषी, ढोल नगारा आणि भव्य दिव्य दरबाराने सर्वांचे मन डोळे दिपून गेले. अग्रसेन महाराज यांच्या सादर केलेल्या देखाव्याने सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे तल्लीन होऊन नृत्यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमात माता की चौकीमध्ये उषा तुलस्यीनजी यांनी सादर केलेले भक्तिमय गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. सर्व नागरिक भक्तिमय गीतात तल्लीन होऊन नृत्य करीत होते, यावेळी शंकर पार्वती तसेच सीता यांच्या वेशभूषा केलेले सर्वांची मन आकर्षित केले होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे उपाध्यक्ष उपमहापौर सुनिता वाडेकर तर रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर तसेच माजी अध्यक्ष सुभाष अग्रवाल, सुनिल अग्रवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचे सत्कार वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पर्यावरणाला चालना देत शाल तसेच तुळशीचे रोपटे सर्व उपस्थितांना भेट देऊन सत्कार करण्यात आले, याप्रसंगी अध्यक्ष दिपक अग्रवाल, उपाध्यक्ष पवन अग्रवाल, सचिव राहुल अग्रवाल, कोषाध्यक्ष मनीष गोयल, भंडार प्रमुख प्रमोद बन्सल, उत्सव प्रमुख पूर्णेश अग्रवाल तसेच समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleगडचिरोली जिल्हयात उगम पावलेली शिवनाथ नदी हि छत्तीसगड राज्याची गोदावरी – डाॅ. नामदेव उसेंडी
Next articleशहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.