Home गडचिरोली गडचिरोली जिल्हयात उगम पावलेली शिवनाथ नदी हि छत्तीसगड राज्याची गोदावरी – डाॅ....

गडचिरोली जिल्हयात उगम पावलेली शिवनाथ नदी हि छत्तीसगड राज्याची गोदावरी – डाॅ. नामदेव उसेंडी

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0021.jpg

गडचिरोली जिल्हयात उगम पावलेली शिवनाथ नदी हि छत्तीसगड राज्याची गोदावरी – डाॅ. नामदेव उसेंडी        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्रात उगम पावलेली शिवनाथ नदी ही छत्तीसगड राज्याची वैनगंगा, गोदावरी महाराष्ट्रात ज्या प्रकारे त्र्यबंकेश्वर ला गोदावरीचे उगम स्थान समजतात त्याच प्रकारे छत्तीसगड राज्याला सुजलाम सुफलाम करणारी शिवनाथ नदीचे उगम स्थान कोरची तालुक्यातील कोटगुल जवळील गोडरी या गावामध्ये असुन या स्थळाला छत्तीसगड राज्यातील जनता त्र्यबंकेश्वर सारखा श्रध्दास्थान मानतात. म्हणुनच छत्तीसगड मधील मोहला मानपूरचे आमदार व संसदिय सचिव मंत्रालय रायपूर श्री.इंदरशहा मडावी व त्यांच्या शेकडो समर्थकांनी गोडरी येथे येवून शिवनाथ नदीच्या उगमस्थानाची शेकडो कार्यकत्र्यांसह श्रध्देने पुजा अर्चना केली. गोडरी येथुन उगम पावणारी शिवनाथ नदी संपुर्ण छत्तीसगड राज्यामध्ये त्याचे पात्र महाराष्ट्रातील गोदावरी, वैनगंगा सारखे विस्तृत होवून छत्तीसगड राज्याला सिचंनाच्या माध्यमातुन सुजलाम सुफलाम केल्यानेच छत्तीसगड राज्याला देशात ‘धान का कटोरा’ हा मान सन्मान प्राप्त झाला असल्याने महाराष्ट्र सरकारने या उगम स्थानाला धार्मीक पर्यटन स्थळाचा दर्जा देवून क्षेत्राचा सर्वांगीन विकास करावा अशी मागणी आमदार व संसदिय सचिव मंत्रालय रायपूरचे श्री. इंदरशहा मडावी यांनी केली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस महासचिव तथा माजी आमदार डाॅ.नामदेव उसेंडी हे सुध्दा उपस्थीत होते. या प्रसंगी त्यांनीे समयोचीत मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, शिवनाथ नदीचे उगमस्थान हे महाराष्ट्रात असणे हि महाराष्ट्रा साठी गर्वाची बाब असुन आजपर्यंत हे स्थळ दुर्लक्षीत राहीले, परंतु यानंतर मात्र महाराष्ट्र सरकारच्या पर्यंटन विभागाकडे पाठपुरावा करुन या क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन डाॅ. नामदेव उसेंडी यांनी दिले. यावेळी कोरची तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मनोज अग्रवाल, छत्तीसगड राज्याचे संजय जैन,लखगणुराम कार्यपाल, दिनेशशहा मांडवी, लच्छु सावले, अभिमन्यू मडावी, सुजाण पुराम , श्रीमती उमाताई पटेल,नारद कातलाम, भालचंद्र कोरेटी,मीनाताई माली, अब्दुल खालिक, राजेश नैताम, परमेश्वर लोहबरे,माजी.प.स. सदस्य मारगायेंजी, गुलफिगारजी, आतलांमजी, पत्रकार वैरागडेजी, ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनंजय ताटपलन,भुवन मुलेटी, पंकज बघवा, दयाराम पढरे, हिरा आडूलवार, अर्जुन कोरेटी, पन्नालाल फुलारे, विनोदकुमार कोरेटी, पूरणशाह कोरेटी, आदी बहुसंख्येने युवक युवती महिला ग्रामवासी उपस्थित होते.

Previous articleजळगावमधील मराठा मोर्चात पिंपरीतून शेकडो बांधव होणार सहभागी : सतीश काळे.
Next articleअग्रसेन महाराज यांची जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here