Home वाशिम साखरा येथील शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….

साखरा येथील शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….

111
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_191951.jpg

साखरा येथील शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….

वाशिम जिल्हा प्रतिनिधी गोपाल तिवारी 

साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने भव्य दिव्य अशी शिव सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये वाशिम तालुक्यातील जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.इयत्ता १ ते ८ वीच्या दरम्यान दोन गटात ही परीक्षा पार पडल्याची माहिती स्पर्धा परीक्षा प्रकल्प प्रमुख मुख्याध्यापक कऱ्हे सर यांनी दिली.
सदरील स्पर्धा परीक्षेचा निकाल काल गाडगे महाराजांच्या जयंतीच औचित्य साधून जाहीर करण्यात आला.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.राजेंद्र महाले, प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच मा.पांडुरंग राऊत,उपसरपंच केशवजी ठाकरे,प्रा.पंढरी पाठे, सुखदेव राऊत,प्रमुख अतिथी म्हणून मा. साहेबरावजी उगले, मा.शिवाजी भागवत महाले, विठ्ठल इंगले, ज्ञानदेव इंगले, विठ्ठल भोयर, नारायण भोयर, आनंदा इंगले, दामु शास्त्री गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होती.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती साखराचे संयोजक ऋषिकेश ठाकरे,गजानन इंगळे, जगदीश इंगळे, ज्ञानेश्वर ठाकरे, पवन धनूडे, गोपाल इंगले, ज्ञानेश्वर इंगले, देवा फोटोग्राफी चे ज्ञानु ठाकरे.ज्येष्ठ सहकारी व गावातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने परीक्षा उत्तमरीत्या पार पडली व त्याचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला अशी माहिती संयोजक ऋषिकेश ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Previous articleरविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा
Next articleजीवनाच्या उद्धारासाठी संतांची संगत महत्त्वाची– रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here