Home वाशिम रविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा

रविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_191453.jpg

रविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा
स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेचे आयोजन
हजारो रुपयांच्या बक्षीसांची लयलुट
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- आजच्या युवकांनी व्यायामात सातत्य ठेवून आपले शरीर सदृढ, चपळ व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाला चालना देण्यासाठी बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भ, वाशिम जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने व स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेच्या आयोजनातून येत्या रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक जिल्हा क्रीडांगणात भव्य विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेनिमित्त विजेत्यांसाठी हजारो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये विदर्भश्री विजेत्यासाठी २५ हजार, बेस्ट पोझरसाठी ११ हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ० ते ६० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ६० ते ६५ वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ६५ ते ७० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ७० ते ७५ वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ७५ ते ८० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार व ८० ते खुल्या गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच भाग घेणार्‍या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येईल
याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आ. लखन मलीक तर प्रमुख उपस्थिती म्हणून खा. भावनाताई गवळी, शिक्षक आम. अ‍ॅड. किरणराव सरनाईक, माजी आम. विजयराव जाधव, भाजपा प्रदेश सदस्य राजु पाटील राजे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, शहरचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर, भानुप्रतापसिंह ठाकुर, दिलीप हेडा, तरणजितसिंग सेठी, अनिल केंदळे, मिलींद भावसार, रामदास चांदवाणी, आनंद चरखा, अ‍ॅड. संतोष मालस, अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, डॉ. शैलेंद्र ठाकुर, डॉ. प्रविण ठाकरे, डॉ. प्रमोद कुमरे, डॉ. सागर ठाकुर, सुशिल बेदरकर, नितेश मलीक, धनंजय हेंद्रे, संतोष शिंदे, नितीन मडके आदींची उपस्थिती राहील. तरी या स्पर्धेला क्रिडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आशिष ठाकुर यांनी केले आहे.

Previous articleमाझा आवडता छंद
Next articleसाखरा येथील शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here