Home अमरावती बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र: म्हणाले-राणांनी “स्वाभिमान पक्ष गुंडाळला” विधानसभेसाठी सेटलमेंट करून...

बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र: म्हणाले-राणांनी “स्वाभिमान पक्ष गुंडाळला” विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवले.

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_202250.jpg

बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र: म्हणाले-राणांनी “स्वाभिमान पक्ष गुंडाळला” विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवले.
___________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
रवी राणा यांनी दहा ठिकाणी सेटलमेंट केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी बरोबर सेटलमेंट केली. विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवले आहे. तुमची काळी कामे काढायला लावू नका. काढायला लागलो तर वांदे होतील, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी राणा दांपत्यांना दिला आहे. दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ना? त्यांचा स्वाभिमान पक्ष राहिला नाही. आम्ही बी-टीम वगैरे काही नाही. नवनीत राणा भाजप, तर तर रानांत स्वाभिमान पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला बी- टीम बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. रानांनी स्वाभिमान पक्ष गुंडाळला असला, तरी लोकांच्या मनात स्वाभिमान शिल्लक आहे. असा तुला कडू यांनी लगावला आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी तो थोडी बाज असल्याचे पुरावे त्यांनी द्यावे अन्यथा २६ तारखे नंतर आम्ही त्यांना कोर्टात खेचू, काल परवा त्यांनी माफी मागितली. साड्यापेक्षा ही जलद गतीने ते रंग दिवसाआधी माफी मागत फिरत होता. आता ओरडतो, एवढ्या लबाड माणसाला लोक जातात कसे. पत्नी भाजपमध्ये नवरा स्वाभिमान मध्ये पोराला प्रहार मध्ये पाठवून द्यावे. मीच एबीसी करतो, त्या अभिनेत्री आहेत म्हणून त्या रडल्या. त्या कुठल्याही प्रसंगात रडू शकतात, अशी टीका सुद्धा बच्चू कडू यांनी केलेली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावरून वातावरण तापले आहे. यात माजी मंत्री बच्चू कडू आणि राणा दांपत्य यांच्यातील वाद काही केल्या कमी होत नाही. आमदार रवी राणा म्हणाले की, आमचा भाऊ हा तोडी बाज आहेत. पूर्ण महाराष्ट्रात सेटलमेंट करण्यात माहीर आहे. राज्यात एखादा सेटलमेंट कमिशनर होत असेल तर त्याला द्यावं, बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे. अशी टीका आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जाहीर सभेतून केली. आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनीत राणा यांच्या नामांकन आणि जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी रवी राणा यांनी हे गंभीर आरोप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here