Home वाशिम वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश

वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश

136
0

आशाताई बच्छाव

1000305319.jpg

गोपाल तिवारी वाशिम जिल्हा ब्युरो चीफ 
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश

वाशिम जिल्हा वैनगंगा

नळगंगा नदीजोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे या भागात सिंचनाचा प्रश्न व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे वाशिम जिल्हा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प संघर्ष समितीच्यावतीने संस्थापक अध्यक्ष हरिष सारडा यांच्या नेतृत्वात आज २० एप्रिल रोजी मंगरुळपीर येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ मुख्य सचिव यांना फोनवर संपर्क करुन या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे

वैनगंगा नळगंगा संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश

संघर्ष समितीला मोठे यश मिळाले असून, संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मात्र प्रत्यक्षात डिपीआरच्या निविदेतून वाशिम जिल्हा वगळण्यात आला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यावर मोठा अन्याय झाला होता. सदर बाब व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभिर्य ओळखून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट

मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांशी १५ मिनीटे सविस्तर चर्चा केली व तात्काळ फोनद्वारे मुख्य सचिवांना वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्याचे निर्देश दिले.

यावेळी संघर्ष समितीचे

अध्यक्ष हरिष सारडा समवेत व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, तांत्रीक सल्लागार सचिन कुळकर्णी व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जि. प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, सदस्य निलेश सोमाणी समवेत पदाधिकारी उपस्थित होते. सदर निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here