आशाताई बच्छाव
अनसिंग /वाशिम (प्रतिनिधी गोपाल तिवारी) — अनसिंग येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील भक्तमंडळींच्या वतीने मंदिर परिसरात उसळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी काकड आरती, अभिषेक, पूजाअर्चा झाल्यानंतर श्री विठ्ठलाचे आकर्षक फूलांची सजावट करण्यात आली. त्यानंतर हरिपाठ, भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. सकाळ पासुन ५०१ कि ची हुसळ मंदिर परिसरात सर्व भाविकांना उसळ वाटप करण्यात आले. गावातील महिला आणि तरुण मंडळांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाला गावातील सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
“आषाढी एकादशी ही भक्ती, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. या निमित्ताने सर्व गावकरी एकत्र येतात, त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण होते,” असे प्रतिपादन ग्रामस्थांनी यावेळी केले.
(फोटो: विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमाचा)






