Home वाशिम आषाढी एकादशीच्या निमित्त सातव लॉनमध्ये उसळ वाटप

आषाढी एकादशीच्या निमित्त सातव लॉनमध्ये उसळ वाटप

319

आशाताई बच्छाव

1001678602.jpg

आषाढी एकादशीच्या निमित्त सातव लॉनमध्ये उसळ वाटप
अनसिंग/वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ:-( ता.६ ) येथील सातव लॉनमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिक सातव व त्यांचे बंधू संदिप सातव यांनी पांडूरंगाचे चरणी भक्ती अर्पण करीत संत परंपरेचा उजाळा देत विठुरायाचे भाविक भक्ताकरीता उसळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सातव लॉनमध्ये भाविक भक्ताचे दर्शनासाठी विठु माऊलीची मुर्ती ठेवण्यात आली होती तीची सर्वप्रथम विठ्ठल सातव व त्यांच्या मातोश्री बेबीताई सातव यांचे हस्ते विधीवत पूजाअर्चा करण्यात आली व भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादत भक्तीमय वातावरणात आपुलकीने भरलेल्या फराळरुपी प्रसाद म्हणून उसळ वाटप करण्यात आला या उसळ रूपी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो च्या संख्येत भाविक भक्तांचा जनसागर उसळला होता
याप्रसंगी मंगलमय प्रसंगी भाविक भक्तां बरोबरच अनसिंग येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमर चौरेसह त्याचा कर्मचारीवर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते नथ्थूजी कापसे,बालू माल शरद रोकडे किशोर सारडा , श्रीराम कापसे, गणेश बियाणी ,यश चव्हाण अशा अनेक मान्यवरांनी फराळाचा आस्वाद घेतला व ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब ठरली असे उद्गगार काढून भक्तीमय सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सातव परिवाराचे आभार मानले पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील विठ्ठल मंदिर,चोळातील महादेव मंदिर,प्रभाग क्रं.चारमधील मारोती मंदिर,श्री. शृंग ॠषी महाराज मंदिर अशा अनेक ठिकाणी उसळ वाटप करण्यात आला.

Previous articleज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली..!’ – जयश्री शेळके आणखी काय म्हणाल्या..?
Next articleशासकीय स्त्री रुग्णालयात पेशंटला घेऊन येणाऱ्या वाहनचालकाला करावी लागते तारेवरची कसरत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.