Home बुलढाणा ज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली..!’ – जयश्री शेळके आणखी...

ज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली..!’ – जयश्री शेळके आणखी काय म्हणाल्या..?

115

आशाताई बच्छाव

1001678597.jpg

‘ज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली..!’ – जयश्री शेळके आणखी काय म्हणाल्या..?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेच्या राज्य
प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी या आमदार महोदयांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी करीत त्यांच्यावर टीका केली आहे.
‘युवा मराठा ‘ने यासंदर्भात जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात देत आहोत.. त्या म्हणाल्या की, दिल्लीची जीहुजुरी करण्यात किती लाचारी पत्करायची याला काही मर्यादा? परंतु या सर्व मर्यादला पार धुळीला मिळविण्याचे काम काही एसएनसी गटाचे प्रमुख व आमदार करीत आहे. काल एका आमदार यांनी जे काही वक्तव्य केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचे काम या आमदार महोदय यांनी केले आहे. त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजेआणि ज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली अशा अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र प्रेमाची व खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षा करू शकत नाही, अशा शब्दात जयश्री शेळके यांनी बोचरी टीका केली.

Previous articleशेगावची गायत्री रोहनकर थेट ‘मिस एशिया वर्ल्ड 2025! – दुबईत भारताचा डंका
Next articleआषाढी एकादशीच्या निमित्त सातव लॉनमध्ये उसळ वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.