Home नाशिक व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेची चालढकल; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण...

व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेची चालढकल; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा – राजेंद्र पाटील राऊत

102
0

आशाताई बच्छाव

1000238723.jpg

 

व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी
नाशिक जिल्हा परिषदेची चालढकल; विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा – राजेंद्र पाटील राऊत
प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क- व-हाणे ता. मालेगाव येथील ग्रामपंचायतीने सन २०२१ साली खोटी व बनावट ग्रामसभा घेऊन शासनाची दिशाभूल केली म्हणून सरपंच अपात्र करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे अपील दाखल करण्यात आले.व त्या अपिलावर दिनांक २९ फेब्रुवारी व ७ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर सुनावणी घेण्यात येऊन,व-हाणे सरपंच अपात्र प्रकरणी अंतिम निकाल देणे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना आचारसंहितेच्या नावाखाली सदर सरपंच अपात्र प्रकरणाचा निकाल सुमारे पंचेचाळीस दिवसांपासून अडवून ठेवून दप्तर दिरंगाई कायद्यानुसार निकाल देण्याच्या कृतीचा भंग केलेला आहे.त्याशिवाय संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधून सुध्दा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केलेली असल्याने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विरोधात महाराष्ट्राचे लोकायुक्त , विभागीय आयुक्त,व जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागितली जाणार आहे.तर दिनांक १३ जुनं २०२४ पासून याप्रश्नी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व प्रकरणाचे तक्रारदार राजेंद्र पाटील राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

Previous articleआजच्या तापमानाची दिशा बघता झाडे लावणे काळाची गरज आहे देशातील प्रत्येक नागरिकाने किमान_एक झाड लावावे….दिपक जाधव_
Next articleवैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here