Home वाशिम शहरातील अर्धवट व अपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तीन दिवसात सुरु करा

शहरातील अर्धवट व अपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तीन दिवसात सुरु करा

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_203410.jpg

शहरातील अर्धवट व अपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तीन दिवसात सुरु करा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- नगर परिषद हद्दीत असलेल्या शहरातील विविध अर्धवट, अपूर्ण असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे तातडीने तीन दिवसात सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर यांच्या नेतृत्वात बुधवार, २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, नगर परिषद हद्दीमध्ये विशेष रस्ता अनुदान या लेखाशिर्ष अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते व डांबरीकरण रस्ते निर्माणाची जवळपास ४७ कोटी ३७ लक्ष ६७ हजार ४७१ रुपयांची कामे छत्रपती संभाजीनगर येथील मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीच्या माध्यमातून केली जात आहेत. शहरातील विकासात्मक कामांचा कार्यारंभ आदेश ०४ मार्च २०२१ रोजी दिलेला असून, विकास कामांची मुदत ही कार्यारंभ आदेशापासून ४०० दिवसांची होती. म्हणजेच ही कामे १३ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, २ वर्ष ८ महिन्यांच्यावर कालावधी होऊन सुद्धा संबंधित विकास कामे पूर्णत्वास गेली नाहीत. सदरील कामांकरीता कंपनीने वारंवार मुदतवाढी घेऊनही विकास कामे ठप्प अवस्थेत आहेत. या कामांचा दर्जा देखील अतिशय निकृष्ट आहे. त्यामुळे या कामांची सखोल विभागीय चौकशी करण्यात यावी. तसेच मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीस काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
यासंदर्भात शिवसेनेकडून निवेदन देऊन सुद्धा रस्ता कामात भ्रष्टाचार करणार्‍या अधिकारी, ठेकेदारांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या सर्व प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अपूर्णावस्थेत असलेल्या या रस्ताकामांमुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कित्येकांना अपघातामुळे अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे शहरातील बंद अवस्थेत असलेली सिमेंट काँक्रीट रस्ता कामे तातडीने ३ दिवसांत सुरू करण्यात यावेत, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शुक्रवार, २३ फेब्रुवारीला तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर यांच्यासह जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजानन देशमुख, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, शहर संघटक नामदेवराव हजारे, शहर समन्वयक राजाभैय्या पवार, चंद्रकांत खेलुरकर, पांडूरंग पांढरे, विठ्ठलराव चौधरी, गजानन ठेंगडे, शाम दळवी, किशोर थोरात, महादेव कांबळे, रवि राऊत, बालाजी वानखडे आदी उपस्थित होते.

Previous articleसर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे
Next articleबैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here