Home नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे पीककर्ज,सन्मान निधीचे प्रश्न सोडवण्याची मागणी..

जिल्हाधिकाऱ्यांकडे पीककर्ज,सन्मान निधीचे प्रश्न सोडवण्याची मागणी..

119

आशाताई बच्छाव

IMG-20221008-WA0026.jpg

जिल्हाधिकाऱ्यांकडे पीककर्ज,सन्मान निधीचे प्रश्न सोडवण्याची मागणी..

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

प्रतिनिधी-पिककर्जाचे उद्दिष्ट अपूर्ण असलेल्या व परिपत्रक बाजूला ठेऊन मनमानी पध्दतीने पीककर्ज वाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांवर कार्यवाही करा.सन्मान निधीला पात्र असून,अजून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.त्यासाठी सजानिहाय कॅम्प घेण्याचे आदेश द्या.अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे दि.7 ऑक्टोबर रोजी स्वा.शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही.पीककर्ज वाटप करतांना बँका परिपत्रकानुसार कर्ज वाटप न करता मनमानी पध्दतीने काम करून शेतकऱ्यांची अडवणूक व लूट करत आहेत.एक वर्षांपासून प्रलंबित असलेली पिककर्जाची फाईल न होता.नंतरच्या फाईली पूर्ण होत आहेत.कारण,पिककर्जाची फाईल दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या तारखेची पोच दिली जात नाही.त्यामुळे हा प्रकार घडत आहे.हे बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाच्या फाईलीची पोच दिली पाहिजे.पंतप्रधान कार्यालयाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सन्मान निधी योजनेसाठी पात्र असून देखील आज प्रयन्त लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे.या लाभासाठी शेतकरी तलाठी,तहसील कार्यालयाला सारखे चकरा मारत आहेत.तरी हे पात्र शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत.हे वंचित असलेले शेतकरी गरजू आहेत.या पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी,सजानिहाय कॅम्प घेतले पाहिजेत.त्यामुळे या गरजू शेतकऱ्यांना सुलभ होईल.जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयासंबंधी तात्काळ बैठक बोलावून प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे,असे निवेदनात सांगितले आहे.

Previous articleयेवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.
Next articleमुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा व रावणाचे करण्यात आले दहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.