Home नांदेड मुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा व रावणाचे करण्यात आले दहन

मुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा व रावणाचे करण्यात आले दहन

152

आशाताई बच्छाव

IMG-20221006-WA0022.jpg

मुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा व रावणाचे करण्यात आले दहन
मुखेड प्रतिनिधी/ बस्वराज स्वामी वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा करण्यात आले.अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आज आवडके परीवारांनी जोपासली.कै.शिवराज अप्पा आवडके यांनी अनेक वर्षांपासून ची ही पंरपरा चालु ठेवली होते अचानक काही महीण्यापुर्वी त्याचे निधन झाले.अता लोकांच्या मनात भर्म निर्माण झाला होता.ही पंरपरा चालु राहील का नाही असा प्रश्न लोकांच्या मनात रुतत होता.कै.शिवराज अप्पा आवडके यांचें चिरंजीव कैलास अप्पा व दिनेश अप्पा यांनी प्रती वर्षा प्रमाणे यंदाही ही पंरपरा पुढेही चालू राहील असे ग्वाही त्यांनी दिली.या वेळी सुरुवातीला वीरभद्र मंदिर येथुन विठ्ठल मंदिर, मारोती मंदिर, भवानी मंदिर, गणपती मंदिर ते गावाच्या सीमालगत जिल्हा परिषद शाळा येथे शमदडीच्या झाडाखाली शस्त्र ठेऊन पुजा आरती करण्यात आली व रावणाचे दहन करण्यात आले.यावेळी कैलास अप्पा आवडके,युवा नेता दिनेश अप्पा आवडके,गंगाधर सावकार वट्टमवार,वीजय घाळे, सुरेश पंचाक्षरे,दिलीप सा.वट्टमवार,भगवान ओदिलवाड,सुरज खळुरे,गुनवंत माहाराज धुर्वे,गंगाधर घोगरे,मलीकार्जुन खळुरे,अमोल येमेकर, नागनाथ थळपत्ते, बस्वराज थळपत्ते,इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांकडे पीककर्ज,सन्मान निधीचे प्रश्न सोडवण्याची मागणी..
Next articleवानखेड वान नदीपात्रात वाळू तस्करी ला महसूल विभागाचे खुले अभय.! “जनता त्रस्त तहसीलदार मस्त”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.