Home बुलढाणा वानखेड वान नदीपात्रात वाळू तस्करी ला महसूल विभागाचे खुले अभय.! “जनता त्रस्त...

वानखेड वान नदीपात्रात वाळू तस्करी ला महसूल विभागाचे खुले अभय.! “जनता त्रस्त तहसीलदार मस्त”

182
0

आशाताई बच्छाव

IMG-20221008-WA0015.jpg

वानखेड वान नदीपात्रात वाळू तस्करी ला महसूल विभागाचे खुले अभय.! “जनता त्रस्त तहसीलदार मस्त”

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील वान नदी पात्रात रेतीचा अवैध व्यवसाय करणारे रँकेट सक्रीय असून वाणनदीपात्रातील रेती वाहतूक करणारे माफिया खुलेआम अवैध मार्गाने तष्करी करीत आहेत. अवैद्य वाळू तस्करी करणाऱ्यांना गावातील सुज्ञ नागरिकांनी किंवा दक्षता समिती ने रोखण्याचा प्रयत्न केल्यास रेती माफियांकडून त्यांचे रेतीचे वाहन थांबवणाऱ्यास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच हे असतात. आणि महसूल विभागाकडून संबंधित रेती तस्करांवर दक्षता समितीने कार्यवाही करावी असे सांगण्यात आले होते. परंतु दक्षता समिती नेहमीच सक्रियपणे रेतीमाफीयांना तस्करी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते आणि वाहन थांबवून संबंधित तहसीलदार , मंडल अधिकारी, तलाठी यांना माहिती देण्यात येते परंतु मंडल अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून माहिती देऊनही दक्षता समितीने वाहन पकडल्यानंतर केव्हाच महसूल विभागाकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी रेती माफियांकडे हेतू पुरस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे सध्या परिस्थितीत वानखेड येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असतो त्यामुळे येथील मंदिरात जिल्हा बाहेरून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी वानखेड येथे येत असतात. आणि रेती तस्करी करणाऱ्या वाहनाला कुठल्याही प्रकारे नंबर प्लेट दिसून येत नाही. अवैद्य रेती वाहतुक विना नंबर वाहनाने भरधाव वेगाने रात्रंदिवस तस्करी चालू असते. त्यामुळे नवरात्र उत्सव लक्षात घेता एखादी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्व जबाबदार संबंधित महसूल विभाग राहील. कारण ह्या बाबत तलाठी व मंडल अधिकारी वानखेड यांना सुध्दा अवैद्य वाळू तस्करी चालू असल्याची माहीती दिली आहे . तहसिलदार यांना सुद्धा वारंवार माहिती देऊनही महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही . आता पर्यत तो व्यवसाय थांबला नाही. ह्याकडे पोलीस व संबंधित महसूल विभागाने विषेश करून लक्ष देऊन अवैध रूपाने करण्यात येणार्‍या रेती उत्खनन व वाहतूकीला आळा घालावा. अशी मागणी दिनांक 3 आक्टोंबर रोजी ग्रामपंचायत वानखेड सरपंच तथा दक्षता समिती अध्यक्ष यांनी तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली असून सुद्धा संग्रामपूर महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही हे विशेष.

Previous articleमुक्रमाबाद येथे सीमोल्लंघन शस्त्र पुजा व रावणाचे करण्यात आले दहन
Next articleमुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here