Home मुंबई आताची सर्वात मोठ्ठी बातमी..दोन हजाराची नोट उद्यापासून चलनात वापरता येणार नाही…! नोट...

आताची सर्वात मोठ्ठी बातमी..दोन हजाराची नोट उद्यापासून चलनात वापरता येणार नाही…! नोट बदलण्यासाठी शेवटचे सात दिवस मुदतवाढ

56
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-062305_Chrome.jpg

आताची सर्वात मोठ्ठी बातमी..दोन हजाराची नोट उद्यापासून चलनात वापरता येणार नाही…! नोट बदलण्यासाठी शेवटचे सात दिवस मुदतवाढ
मुंबई ,(प्रतिनिधी विजय पवार)
2000 Note : दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा किंवा इतर नोटांमध्ये बदलून घेण्यासाठी आता शनिवार (ता. ३०) एकच दिवस बाकी आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्धारित केलेला कालावधी ३० सप्टेंबर २०२३ ला म्हणजे शनिवारी संपणार आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा अद्याप जमा किंवा बदली केल्या नसल्यास त्या ताबडतोब बँकेत जमा करणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार रुपयांच्या ९३ टक्के नोटा परत आल्या आहेत.

३० सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करता येणार नाही किंवा तिची देवाणघेवाणही करता येणार नाही. या मुदतीनंतर ती फक्त रिझर्व्ह बँकेतून बदलून घेता येऊ शकेल. मात्र, यासाठी तुम्ही नोटा वेळेत का जमा केल्या नाही किंवा बदलून घेतल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
हेही वाचा: 2000 Note: दोन हजारांच्या नोटा अजूनही तुमच्या खिशात? बदलण्यासाठी शेवटचे सात दिवस! नाहीतर…

रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात किंवा त्या इतर मूल्यांच्या नोटांसह बदलून घ्याव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती.

हेही वाचा: 2000 Note Exchange : दोन हजारांची नोट कशी बदलायची? उरले मोजके दिवस आर.बी.आयने दिलेल्या निर्दशांनुसार ७ आँक्टोबर पर्यत २०००/- रुपयांच्या नोटा बदलून देण्यास मुदतवाढ दिली आहे.एका वेळेस फक्त २० हजार रुपये इतकेच रुपये बदलून मिळणार असल्याचेही आर.बी.आयने स्पष्ट केले आहे.तर ७ दिवसानंतर बँकितून नोटा बदलून मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here