Home नाशिक जळगाव जिल्ह्यातून हमालीसाठी आलेल्या युवकाची सप्तश्रुंगी गडावर गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातून हमालीसाठी आलेल्या युवकाची सप्तश्रुंगी गडावर गळफास घेऊन आत्महत्या

108
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-212349_Google.jpg

जळगाव जिल्ह्यातून हमालीसाठी आलेल्या युवकाची सप्तश्रुंगी गडावर गळफास घेऊन आत्महत्या

कळवण,(प्रतिनिधी बाळासाहेब निकम)
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातल्या सप्तश्रुंगी गडावर जळगाव
जिल्ह्यातून हमाली कामासाठी आलेल्या एका तरुणाने घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष माधव भावसार (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या घटनेची नोंद कळवण पोलिसांत करण्यात आली आहे, याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भावसार हा सप्तशृंगी गडावर हमाली काम करून उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घरमालक बापू मोरे यांनी का ठिकाणी पाणी मारण्यासाठी पाण्याची मोटर सुरु केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पाईपमध्ये पाणी येत नसल्याने ते बांधकाम ठिकाणच्या चौथ्या मजल्यावर बघण्यासाठी गेले असता त्यांना मयत संतोष उर्फ (भंभ्या) भावसार दोरीच्या साह्याने तसेच पाण्याच्या पाईप नळीत गुंतल्याचे दिसून आले आहे, यानंतर कळवण पोलीस ठाणे अंतर्गत नांदुरी पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांना बांधकाम मालक यांनी कळविले असता पोलिसांनी मयत भावसार याच्या आधारकार्डची चौकशी करत त्याच्या कुटुंबियांना संपर्क करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालनुसार भावसार याचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कुलकर्णी, पोलीस नाईक निलेश शेवाळे, संदीप बत्तीसे, नितीन देवरे हे करत आहेत

Previous article🌸 पितृपक्ष🌸
Next articleआताची सर्वात मोठ्ठी बातमी..दोन हजाराची नोट उद्यापासून चलनात वापरता येणार नाही…! नोट बदलण्यासाठी शेवटचे सात दिवस मुदतवाढ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here