Home कोरोना ब्रेकिंग रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

106
0

⭕ रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ⭕
मुंबई ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :  लॉकडाऊन का वाढवला हे सांगत असतानाच नवा लॉकडाऊन कसा असेल याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

31 मे पर्यंत महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण यामागे कुणाला डांबून ठेवायचा उद्देश नाही, असं ठाकरे म्हणाले. “कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही”, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन का वाढवला?
महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे जास्त रुग्ण आहेत. जर लॉकडाऊन, संचारबंदी केली नसली तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोक गमावले असते याची आकडेवारी ऐकून अंगावर काटा येतो. कोरोना संपलेला नसला, तरी त्याचा संसर्ग कमी झाला आहे. गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे…

आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. पण महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त भागात उद्योग सुरू झाले आहेत.

Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

भारतात कोरोनाव्हायरस बाधितांची संख्या लाखाच्या घरात पोहोचण्याच्या बेतात आहे. जगात ही देश अकराव्या स्थानी पोहोचला आहे.भारतात दर दशलक्ष लोकसंख्येत 70 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि दहा लाखांतले दोन जण कोरोनाने मरत आहेत. हा आकडा जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. हे वरच्या ग्राफिक्सवरून दिसेल.

आपल्या देशाचा विचार केला, तर देशव्यापी आकडे दिलासादायक असले तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Previous articleआज पहाटे सोलापूरहून श्रमिकांना घेऊन निघालेली एस टी महामंडळाच्या बसला भीषण अपघात
Next articleपारनेरच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे यांचा मनमानी करीत असल्याचा तलाठयांचा आरोप…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here