Home कोरोना ब्रेकिंग आज पहाटे सोलापूरहून श्रमिकांना घेऊन निघालेली एस टी महामंडळाच्या बसला भीषण अपघात

आज पहाटे सोलापूरहून श्रमिकांना घेऊन निघालेली एस टी महामंडळाच्या बसला भीषण अपघात

143
0
  1. ⭕ यवतमाळ
    आज पहाटे सोलापूरहून श्रमिकांना घेऊन निघालेली एस टी महामंडळाच्या बसला भीषण अपघात ⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    यवतमाळ: स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी घेऊन निघालेल्या बसला आज सकाळी झालेल्या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

    यवतमाळ येथे आज पहाटे ही घटना घडली. अपघातग्रस्त बस सोलापूरहून झारखंडकडे निघाली होती. यवतमाळ येथे ही बस एका ट्रकला धडकली. यात चार जण जागीच ठार झाले. तर, १५ जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

    करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरीत मजुरांचे हाल सुरूच आहेत. केंद्र सरकारनं प्रवासाची मुभा देण्याआधी अनेकांनी पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न केला होता. या प्रवासातही अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. औरंगाबादमध्ये अलीकडेच १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.

Previous articleपेठ वडगांव मधे सलून दुकाने मागितली सुरू करणेसाठी केली मागणी.*
Next articleरेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here