- पारनेरच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे यांचा मनमानी करीत असल्याचा तलाठयांचा आरोप…!!अहमदनगर(ब्युरो टिम युवा मराठा न्युज) ः -पारनेर महसूल विभागात कोरोनाच्या काळातही राजकारण सुरू आहे. तहसीलदार विरूद्ध तलाठी असा संघर्ष तेथे पेटला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांचे म्हणणे आहे की, तलाठी नियुक्तीच्या ठिकाणी रहात नाहीत, तर कर्मचारी म्हणतात तहसीलदार मॅडम मनमानी करतात. पगार नसतानाही आम्ही निवारा केंद्र चालवतो, याचे त्यांना काहीच वाटत नाही. सॅनिटायझरसारख्या सुविधाही पुरवल्या जात नाहीत.
हेही वाचा – तो कोरोनाबाधित जावई पठारवाडीचा
दिवसेंदिवस तहसीलदार देवरे यांच्याविरोधात तक्रारी वाढत चालल्या आहेत. काल तर तालुक्यातील ४५ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
अॉडिओ राज्यभर व्हायरल
तहसीलदार देवरे यांच्याविरोधात मोठी कर्मचारी व अधिकारी मंडळी असली तरी बाजूनेही तेवढेच लोकं आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही होते. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रबोधनासाठी केलेले अॉडिओ कमालीचे व्हायरल झाले आहेत. त्यांची कामाची ही पद्धत सर्वसामान्य जनतेला भावते आहे.
मॅडम हेकेखोर आहेत
कर्मचारी म्हणतात, तहसीलदार मॅडम या हेकेखोर आहेत. त्यामुळे काम करताना परिणाम होतो. त्या कर्मचाऱ्यांना सारख्या निलंबित करण्याची धमकी देतात, यामुळेच त्यांच्याविरोधात असंतोष आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
तहसीलदार देवरे यांनी तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष विनायक निंबाळकर यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. चार माणसांत त्यांनी, तुम्ही टिटवीचे मटण खाता की काय मॅडम…असे विचारून विचारून अपमान केला. तसेच बदली करणार असल्याचेही सांगितले.
तहसीलदार यांनी तक्रार केल्यानंतर तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच त्यांचे गाऱ्हाणे केले आहे. त्यावर ४५जणांच्या सह्या आहेत.
