• Home
  • लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!*

लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!*

  • *लोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!* मालेगांव (सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या लोणवाडे गावातही आता कोरोनाचा शिरकाव झालेला असून,त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.चाळीसगाव फाटयावर असलेले लोणवाडे हे गाव मालेगाव तालुका पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तेथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.लोणवाडे येथील प्रतिष्ठित शेतकरी व तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तीलाच कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाकडून या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील पंधरा व्यक्तींना क्वारटांईन करण्यात आले आहे.तर लोणवाडे ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवक पवार यांनी संपूर्ण गावात फवारणी केली आहे.
anews Banner

Leave A Comment