आशाताई बच्छाव
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व जगदंबा देवी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई महोत्सव निमित्त ग्रंथराज पारायण दिंडी मध्ये आयोजित केलेल्या चित्ररथ मिरवणुकी मध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई या महाविद्यालयाने शिवराज्यभिषेक सोहळा चित्ररथ तयार केला होता, या चित्ररथ मिरवणुकीमध्ये सोनई महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. मा. प्राचार्य डॉ.शंकर लावरे सर व मा.उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ज्ञानेश्वर पादर, प्रा. विरेंद्र दरंदले, प्रा.निवृत्ती सोनवणे, डॉ.नामदेव घुले, प्रा.नारायण वाघ व विक्रम गडाख या सर्वांनी हा चित्ररथ बनविण्यासाठी मेहनत घेतली.या चित्ररथातील सर्व सहभागी कलाकारांचे व प्राध्यापकांचे आदरणीय ह.भ.प विश्वास मामा गडाख,संस्थेचे उपाध्यक्ष मा.उदयन दादा गडाख तसेच संस्थेचे सहसचिव डॉ.विनायक देशमुख सर या सर्वांनी अभिनंदन केले.






