Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला

टोम्पे महाविद्यालयात वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_160837.jpg

टोम्पे महाविद्यालयात वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची रक्ततुला

165 रक्तदात्यांनी केले रक्तदान…
मयुर खापरे चांदुर बाजार
स्थानिक : गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या 20 व्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील सैनिकांना समर्पित शहीद ओंकार मासोतकर यांच्या वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांची भव्य रक्ततुला करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून महाविद्यालय भारतीय सरहद्दीवर देशाचे संरक्षण करतांना शहिद झालेल्या जवानांच्या पत्नीची किंवा मातापित्यांची ‘रक्तातुला कार्यक्रम’ देशाला समर्पित जवानांच्या शौर्याला सलाम म्हणून आयोजित करत असते. यावर्षी सुद्धा भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करतांना वीरमरण आलेले शहीद ओंकार मासोतकर यांच्या वीरपत्नी श्रीमती सरस्वती ओंकार मासोतकर यांचा रक्ततुला कार्यक्रम महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता. सदर रक्तदानाकरिता पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीची रक्तपेढी चमू उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, तहसीलदार, गीतांजली गरड, ठाणेदार सुरज बोंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, रक्तदान समिती अध्यक्ष महेंद्रजी भुतडा, वीरपत्नी श्रीमती सरस्वती मासोतकर, धीरज सातपुते, डॉ. विजय टोम्पे, मासोतकर कुटुंबाचे आप्तस्वकीय प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चांदूरबाजार नगरीचे तहसीलदार गीतांजली गरड यांनी भास्करदादा टोम्पे यांनी एक अनोखी आणि अतिशय भावनिक अशी रक्ततुला रक्तदानाने करून शहीद सैनिकाच्या वीरपत्नीचा सन्मान केला ही अतिशय गौरवाची गोष्ट असल्याचे म्हटले. याप्रसंगी धीरज सातपुते यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करत संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून देशातील सैनिकांना समर्पित रक्तातुलेचा हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी बरोबरच मानवतेचे दर्शन घडवणारा आहे असे म्हणून भास्करदादा टोम्पे, डॉ. विजय टोम्पे व प्रा. प्रणित देशमुख यांचा सैनिक फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे यांनी स्व. संजय टोम्पे यांच्या सामाजिक सेवेच्या कार्यावर प्रकाश टाकून या भव्य अशा रक्ततुला कार्यक्रमात सर्व रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून रक्तदान केल्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी वीरपत्नी सरस्वती मासोतकर यांचा संस्थेच्या वतीने शाल, साडीचोळी, सन्मानपत्र भेट देऊन सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मनीष सावरकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. संजय शेजव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ, कनिष्ठ, डी.एड., बी.एड., बी.व्होक. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, निर्मिती पब्लिक स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना, मंडळाच्या एकूण 165 रक्तदात्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

Previous articleआनंद मेळावातून व्यावहारिक ज्ञान मिळते : शेळके
Next articleअमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथे बंदूक जप्त..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here