Home Breaking News 🛑 परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत? 🛑

🛑 परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत? 🛑

87
0

🛑 परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत? 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 31 ऑगस्ट : ⭕ परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकारची सूत्र हलायला लागली आणि बैठकींचं सत्र सुरू झालं. परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेऊ शकतो का याचा निर्णय आता सोमवारवर गेला आहे.

शनिवार असूनही उच्च आणि तंत्रशिश्रण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात अखंड बैठका सुरू आहेत. त्यात महत्त्वाची ठरली कुलगुरूंबरोबरची बैठक. दुपारी 1 वाजता राज्यातल्या सर्व कुलगुरूंबरोबर सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. ती परीक्षेसंदर्भातला निर्णय घेईल.

या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित कशा घेता येतील या संदर्भात महत्वाची चर्चा झाली. सोप्यातल्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यासंदर्भात उपाय सुचवले गेले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेपूर्वी मिळाला पाहिजे, अशीही भूमिका मांडण्यात आली. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण त्यांच्यावर परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी दबाव आणला जाणार आहे. त्यांची कुठलीही अडचण होणार नाही, याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असं सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितलं.

’30 सप्टेंबर दुपारी 12 पर्यंत  आम्ही परीक्षा घेऊ शकतो का ? याचा निर्णय येत्या सोमवारी परीक्षा समिती घेणार आहे. सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत परीक्षा समितीचा अहवाल येणार आहे’, असं सामंत म्हणाले.

यानंतर संध्याकाळी चार वाजता माजी कुलगुरू वेरुळकर, विजय घुले तसेच उच्च शिक्षण विभागातील दोन्ही संचालक यांच्या सोबतही बैठक घेणार आहेत.

➡️ कुलगुरूंसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

1) विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकणार नाही.

2) विद्यार्ध्यांना अडचण होणार नाही याचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

3) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करेल.⭕

Previous article🛑 थेट टिव्हीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करणे शक्य 🛑
Next article*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here