• Home
  • नांदेड” कोविड बाधेतुन आज ८ रूग्ण बरे झाले तर नवीन १६ व्यक्ती कोरोनाने बाधित झाले व उपचारा दरम्यान एका महिलेचे मृत्यू झाले, एकूण म्रतांची संख्या १८ वर पोहचली – नांदेड, दि. ३ ; राजेश एन भांगे

नांदेड” कोविड बाधेतुन आज ८ रूग्ण बरे झाले तर नवीन १६ व्यक्ती कोरोनाने बाधित झाले व उपचारा दरम्यान एका महिलेचे मृत्यू झाले, एकूण म्रतांची संख्या १८ वर पोहचली – नांदेड, दि. ३ ; राजेश एन भांगे

नांदेड” कोविड बाधेतुन आज ८ रूग्ण बरे झाले तर नवीन १६ व्यक्ती कोरोनाने बाधित झाले व उपचारा दरम्यान एका महिलेचे मृत्यू झाले, एकूण म्रतांची संख्या १८ वर पोहचली –
🎙️🎙️🎙️🎙️✒️✒️✒️✒️📡📡📡नांदेड, दि. ३ ; राजेश एन भांगे

नांदेड” कोविड बाधेतुन आज ८ रूग्ण बरे झाले तर नवीन १६ व्यक्ती कोरोनाने बाधित झाले व उपचारा दरम्यान एका महिलेचे मृत्यू झाले, एकूण म्रतांची संख्या १८ वर पोहचली –
नांदेड, दि. ३ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 7 बाधित आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित असे एकूण 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 306 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.
नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाच्या महिलेचा गुरुवार 2 जुलै रोजी सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाधित महिलेला उच्च रक्तदाब, श्वासनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरानामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 18 एवढी झाली आहे. शुक्रवार 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 106 अहवालापैकी 71 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले. जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 414 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये गवळीपुरा येथील 20 वर्षाची 1 महिला, नवीन कौठा येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी येथील 31 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर नाका रहेमतनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, चक्रधरनगर येथील 65 वर्षाची 1 महिला, विकासनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, श्रीनगर येथील 38 वर्षाची 1 महिला व 10 व 17 वर्षाचे 2 पुरुष, आंबेडकर येथील 35 व 38 वर्षाचे 2 पुरुष, बळीरामपूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील 27 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 23 व 45 वर्षाच्या 2 महिला आणि 17 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत 414 बाधितांपैकी 306 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 90 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 90 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित उपचार घेत आहे. तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 3 जूलै रोजी 93 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 49,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 716,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 781,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 414,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,
मृत्यू संख्या- 18,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 306,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 90,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 93 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment