Home Breaking News युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 3 जुलै पिंपरीमध्ये कोरोना रुग्णालयात...

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 3 जुलै पिंपरीमध्ये कोरोना रुग्णालयात धक्कादायक प्रकार नर्सिंग कर्मचारी गेले संपावर अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ

90
0

      युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 3 जुलै पिंपरीमध्ये कोरोना रुग्णालयात धक्कादायक प्रकार नर्सिंग कर्मचारी गेले संपावर अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ उडाली आहे मुंबई पुण्यासह राज्यात कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे अशात आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे कोणतीही आरोग्यसेवा अशी कामे करू शकते का डॉक्टर आणि नर्स त्यांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत, या संकट काळात प्रत्येक आरोग्य सेवा कर्मचारी आपल्या गरजु रुग्णांची सेवा करण्यासाठी झटत आहेत या परिस्थितीत कोणीही अमानुषपणे वागू शकत नाही अशी प्रतिक्रिया आपल्या युवा मराठा न्यूज माध्यमाला दिली दरम्यान पुण्यात covid-19चा उद्रेक होण्याची शक्यता आहे कारण पुण्यात चाचण्यांच प्रमाण वाढवलं आहे पण पण तूर्तास लॉक डाऊन चा कुठलाही विचार नाही असे पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले उलट लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णाने विनाकारण बेड्स आडवून ठेवू नये असही आव्हान पालिका आयुक्तांनी केले आहे पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1251 रुग्णांची वाढ झाली आहे यात पुणे मनपा क्षेत्रात 860 पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात282 पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टोन्मेंट परिसरात 45 नवे रुग्ण आढळून आले आहेत एकाच दिवसात झालेली जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे मिळालेल्या माहितीनुसार आमचा विमा उतरवा आणि सुरक्षेची साधनं पूर्वा या मागण्यासाठी कर्मचारी वर्गानी संपत पार्ला असल्याची माहिती समोर येत आहे सगळ्यात गंभीर म्हणजे दवाखान्याच्या संचालिका रेखा दुबे असं काही झालंच नसल्याचा दावा करत होत्या त्या म्हणाल्या की हा सगळा प्रकार रात्री घडला तोपर्यंत सगळे जण काम करत होते कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे मला मोठा धक्का बसला आहे गेल्या काही दिवसापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here