• Home
  • 🛑 जिल्हाच्या बाहेर एसटीने प्रवास करायचा असेल..तर जाणुन घ्या माहिती…! 🛑

🛑 जिल्हाच्या बाहेर एसटीने प्रवास करायचा असेल..तर जाणुन घ्या माहिती…! 🛑

🛑 जिल्हाच्या बाहेर एसटीने प्रवास करायचा असेल..तर जाणुन घ्या माहिती…! 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर :⭕ एसटी महामंडळातर्फे कोल्हापूर-पुणे व सोलापूर मार्गांसह अन्य मार्गांवर प्रासंगिक कराराने बस गाडी घेऊन प्रवास करता येणार आहे. त्यासाठी किमान 22 प्रवाशांनी एकत्र येऊन प्रवासी समूहातर्फे एसटी बस घेता येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पंलगे यांनी माहिती दिली.
कोरोना लॉकडाउनमुळे गेले तीन महिने एसटीची सेवा बंद आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवा सुरू झाली; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद जेमतेम आहे. तरीही परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने नवे नियोजन केले आहे.
कोल्हापुरातून पुणे (हिंजवडी) येथे अनेक प्रवासी प्रवास करतात.
याच धर्तीवर कोल्हापूर-सोलापूर नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत. असे 22 प्रवासी एकत्र आल्यास त्यांना प्रासंगिक करार तत्वावर बस गाड्या देता येतील याशिवाय अन्य कोणत्याही मार्गावरही एका वेळी 22 प्रवासी मिळाले तर त्यांनाही त्या गावाचा प्रवास करता येणार आहे.
अशा प्रासंगिक करारानुसार गाडी घेताना परजिल्ह्यात जाण्यासाठी काढावा लागणारा इ पास त्या त्या प्रवाशांनी स्वतः काढायचा आहे, असेही श्री. पलंगे यांनी सांगितले. असे होऊ शकते बुकिंग
प्रासंगिक करारासाठी बस घेण्यासाठी प्रवाशांना आरोग्य तपासणी अहवाल (फिटनेस सर्टिफिकेट), इ पास, आधार कार्ड अशी कागदपत्रे देऊन प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. वरील सर्व संदर्भासह मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख अथवा आगारप्रमुख यांच्याकडे याबाबतची माहिती अथवा बुकिंगची सुविधा आहे.

लग्न कार्यासह नियमित प्रवासही शक्‍य
लॉकडाउनमुळे अनेक लोक परजिल्ह्यांत अडकून पडले आहेत. अनेकांची लग्नं ठरली आहेत. पन्नास व्यक्तींना लग्नास उपस्थितीसाठी परवानगी मिळते; मात्र पर जिल्ह्यात जाता येत नाही, अशा स्थिती आहे. खासगी गाडीचे चालक क्वारंटाईनच्या भीतीने पर जिल्ह्यात गाडी घेऊन येत नाहीत. याशिवाय नोकरी व्यवसायानिमित्ता नियमित प्रवास करणाऱ्यांचाही खोळंबा झाला आहे, अशा सर्व व्यक्तींना एसटीची प्रासंगिक कराराची गाडी घेता येणे शक्‍य होणार आहे…

प्रति किलोमीटर पन्नास रुपये भाडे
प्रासंगिक करारावर एसटीची गाडी येता जाता 50 रुपये प्रति एक किलोमीटर याप्रमाणे भाडे आकारणार आहे. याशिवाय हॉल्ट असल्यास त्यांचे स्वतंत्र जादा पैसे मोजावे लागणार आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment