Home अमरावती अस्वच्छते वरून आ. प्रवीण पोटेकडून संबंधित त्यांची कान उघडणी: शहरात माणसं नाही,...

अस्वच्छते वरून आ. प्रवीण पोटेकडून संबंधित त्यांची कान उघडणी: शहरात माणसं नाही, किडे माकोडे राहतात का, असे वाटते काय?

36
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231001-082350_WhatsApp.jpg

अस्वच्छते वरून आ. प्रवीण पोटेकडून संबंधित त्यांची कान उघडणी: शहरात माणसं नाही, किडे माकोडे राहतात का, असे वाटते काय?
—————————–
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती/ब्युरो चीफ रिपोर्टर.
पी.एन.देशमुख.
अमरावती शहरात कुठे फीरले तर अस्वच्छता,गान,तुंबलेले नाल्या, गटाऱ्याचे वाहते पाणी, अस्वच्छता, दुर्गंधी अशी कीळसवाणी स्थिती आहे. शहरात माणसं नाही तर किडे ,माकोडे राहतात, असे तुम्हाला वाटते काय, अशा शब्दात शहर भाजप अध्यक्ष आम. प्रवीण भाऊ पोटे यांनी आस्वच्छते वरून म.न.पा. सभागृहात बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत स्वच्छता कंत्राट दारासह स्वस्थ्य निरीक्षकांची कान उघडणे केली. और स्वच्छतेचा कळस झाल्यामुळे नागरिक जेरीस आली असून,म.न.पा.सह माझी नगरसेवकांच्या नावाने बोटे मोडत आहेत. नागरिकाकडून कर वसूल केला जात असून, म.न.पा. स्वच्छता कंन्ट्रॅक्टदरासह स्वस्थ्य निरीक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छ ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो, असे असताना शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून कोणीही गंभीरपणे करतोय बजावत नसल्याचे दिसून आले आहे. मनपा द्वारे नियुक्त८००स्थायी स्वच्छता कर्मचारी हे तर अगदी दत्तक घेतल्यासारखे वागताना दिसतात. मनात येईल तेवढे काम करतात कामावर अनुपस्थित असतात. केवळ कंत्राटी कर्मचारी स्वच्छता करताना दिसतात अशा काम चुकार स्थायी स्वच्छता कर्मचाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा, अशी सूचना आहे. पोटे यांनी मनपा आयुक्तांना केली. राजापेठच्या स्वच्छता कंत्राट दादाचे काम फारच बोगस आहे. त्याला बदला, अशी मागणी भाजप शहर सरचिटणीस चेतन पवार यांनी केली. त्याच वेळेस जुने कंत्राट संपण्याआधी तसेच निवृत्ती होण्याच्या सहा महिने आधी तत्काळ आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी झोननिहाय कंत्राट दिले. त्यामुळे या कंत्राटदारांना कोणाची भीती राहिली नाही. त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा ठपका भाजपच्या राजू कुरील यांनी ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here