Home गडचिरोली उद्या काँग्रेसचे सक्तवसुली संचालनालय कार्यालय(ED) नागपूर येथे धरणे आंदोलन

उद्या काँग्रेसचे सक्तवसुली संचालनालय कार्यालय(ED) नागपूर येथे धरणे आंदोलन

43
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0058.jpg

उद्या काँग्रेसचे सक्तवसुली संचालनालय कार्यालय(ED) नागपूर येथे धरणे आंदोलन

मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी तसेच वाढत चालले महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण या सर्व मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाले असतांना केंद्र सरकार संवैधानिक संस्थाना हाताशी घेऊन अतीशय चुकीच्या व सूडबुद्धीच्या विचाराने विरोधकांना गप्प करण्याचा काम करत आहे. जे केंद्र सरकार विरोधात बोलते त्यावर ED लावून त्याला मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा काम भाजप सरकार करत आहे, नुकताच ED ने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी, आणि खासदार राहुलजी गांधी यांना देखील ED ची नोटीस देण्यात आली आहे.
स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या ह्या केंद्रीय यंत्रणा देखील याला दुजोरा देत असल्याने त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने ED कार्यालयासमोर 13 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून, ह्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व जेष्ठ मंडळी, काँग्रेसचे पदादाधिकारी, युवक, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे. आंदोलनाचे ठिकाण सक्तवसुली संचनालय ( ED) कार्यालय, सुरेंद्रगड रोड, नागपूर असून सर्व कार्यकत्यांनी T. V. टॉवर चौक,सेमिनिरी हिल नागपूर येथे सकाळी 10 वाजता उपस्थित रहायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here