Home गडचिरोली खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने काम करावे आमदार डॉक्टर देवरावजी...

खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने काम करावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220610-WA0037.jpg

खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने काम करावे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा घेतला आढावा

प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षक वर्गाचे केले कौतुक परंतु अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन

खाजगी माध्‍यमिक शाळा व जिल्‍हा परिषदेमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या यावर व्यक्त केली चिंता

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शासनाने भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा

जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या अतिशय चिंताजनक असून खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढत चाललेला कल भविष्यातील गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्याकरिता खाजगी शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले असून त्या बाबतचे निर्देश त्यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिले .

यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री धामणे सर व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री निकम सर प्रामुख्याने उपस्थित होते

गडचिरोली जिल्ह्यामध्ये २७३ खाजगी माध्यमिक शाळा असून जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. नक्षलग्रस्त, डोंगराळ ,जंगल प्रभावित व अशिक्षित असणाऱ्या भागात भौतिक सुविधांच्या शिवाय अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शिक्षक वर्ग अध्यापनाचे काम करीत आहे. त्यांचे कार्य खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. परंतु जिल्हा व तालुका केंद्रावर असणाऱ्या खासगी इंग्रजी शाळा यांच्याकडे पालकांचा वाढत चाललेला कल हा भविष्यात गरीब, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा ठरणार आहे. त्यामुळे उत्तम दर्जाची गुणवत्ता आपल्याला खाजगी शाळांमध्ये व जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असून त्याकरिता जिल्ह्यातील शिक्षण विभागाने अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले असून यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही आढावा बैठकीमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेत.

Previous articleउद्या काँग्रेसचे सक्तवसुली संचालनालय कार्यालय(ED) नागपूर येथे धरणे आंदोलन
Next articleधान खरेदीची मर्यादा वाढवा विदर्भातील आमदारांची केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे एकमुखी मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here