Home गडचिरोली धान खरेदीची मर्यादा वाढवा विदर्भातील आमदारांची केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे एकमुखी...

धान खरेदीची मर्यादा वाढवा विदर्भातील आमदारांची केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे एकमुखी मागणी

30
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220610-WA0020.jpg

धान खरेदीची मर्यादा वाढवा

विदर्भातील आमदारांची केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे एकमुखी मागणी                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

विदर्भातील आमदारांनी केंद्रिय मंत्री पियूषजी गोयल यांची भेट घेऊन खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी केली विनंती

धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन असल्याचा आमदार डॉ देवरावजी होळी यांचा गंभीर आरोप

केन्द्र सरकारच्या नावावर राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीतून राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड

दिनांक ९ जुन २०२२ गडचिरोली

राज्यातील ठाकरे सरकार धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केलेल्या केंद्र सरकारच्या पत्रव्यवहारातून ही बाब उघड झाल्याचा आरोप आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला आहे . त्यामूळे केंद्र सरकारने यात लक्ष देऊन धान खरेदीची मर्यादा वाढवावी अशी एकमुखी मागणी भारतीय जनता पार्टीच्या विदर्भातील आमदार खासदारांनी केंद्रीय मंत्री पियूषजी गोयल यांची मुंबई येथे भेट घेऊन केली

यावेळी माजी मंत्री प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार डॉ देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार विजय रहांगडाले, आमदार टेकचंद सावरकर, यांच्यासह विदर्भातील भाजपा आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यातील उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्टाचार व घोटाळ्यात गुंतलेले असून राज्यातील शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. मागील अनेक दिवसांपासून विदर्भातील आमदार धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र याबाबत ठाकरे सरकारने मागणी संदर्भात केलेला खोटारडे पणा उघड झाला असून खरेदी मर्यादेत किंचित वाढ करून राज्यातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामूळे यात केन्द्र सरकारने जातीने लक्ष देऊन धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी उपस्थित सर्व आमदारांनी केली.

Previous articleखाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने काम करावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleजिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूक संदर्भात बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here