Home अमरावती जिल्हा बँकेच्या सभेत केवळ सत्ताधाऱ्यांचा आवाज: कार्यक्रम पत्रिकेतील सर्व दहावी विषयांना मंजुरी,...

जिल्हा बँकेच्या सभेत केवळ सत्ताधाऱ्यांचा आवाज: कार्यक्रम पत्रिकेतील सर्व दहावी विषयांना मंजुरी, दीड तासात सभा आटोपले.

54
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231001-084306_WhatsApp.jpg

जिल्हा बँकेच्या सभेत केवळ सत्ताधाऱ्यांचा आवाज: कार्यक्रम पत्रिकेतील सर्व दहावी विषयांना मंजुरी, दीड तासात सभा आटोपले.
——————————
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती.ब्युरो चीफ रिपोर्टर.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (,एडीसीसी)आज,शनिवारी पार पडलेल्या आमसभेने सहकार क्षेत्रातील राजकारणाचे सर्व अंदाज फोल ठरविले. आम सभेदरम्यान केवळ सत्याधारांचाच आवाज घुमला. त्यामुळे अगदी एकतर्फी झालेल्या या कार्यक्रम पत्रिकेतील सर्व दाहाही विषयांना विनासायास मंजुरी मिळाली. अवध्या दीड तासात सभेचे संपूर्ण कामकाज आटोपले. पिठासीन सभापती आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेची ६२वीआमसभा आज, शनिवारी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर संस्कृती नाट्यगृहात पार पडली. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत उपविधी बदलाचा विषय असल्याने ती वादळी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. संचालक मंडळाच्या सभेला बायपास करून हा विषय अंतर्भूत केल्याने त्यावर घामाचा होईल ,अशी ही काही चे म्हणणे होते. शिवाय या विषयाला अनुसरून विरोधी बाकावरील संचालक सहकार न्यायालयातही गेले होते. परंतु शुक्रवारी झालेले अंतिम सुनावाणि दरम्यान सहकार विभागाने विरोधकांचा आरोप फेटाळला त्या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे आजच्या सभेत या विषयासह सर्व दहा विषयांना मंजुरी दिली.सन२०२३-२४ साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजा पत्रकाला मान्यता, सन२०२१-२२च्या संनदी लेखापाल यांच्या अहवालातील दो ष दुरुस्ती अहवालाचे अवलोकेशन सन २०२३-२४च्या लेखापरीक्षणासाठी शासनाच्या नाम तालिकेवरील सनदी लेखापरीक्षकांची नियुक्ती फार वर्षांपूर्वी इतर सहकारी संस्थेकडून खरेदी केलेल्या शेअर्सची रक्कमेला राईट ऑफ करण्याबाबतचा निर्णय, तक्रार निवारण समितीचे गठन आणि सर्व शाखा कार्यालयाच्या सुरक्षेसाठी कॅमेरा व इंटेलिजन्स सॉफ्टवेअरची खरेदी हे विषय पटणार ठेवण्यात आले होते. सभेच्या पहिल्या अर्ध्या तासातच उपस्थित सदस्यांनी या विषयांना मंजुरी प्रदान केले. सभेला पिठासीन सभापती तथा बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, माजी अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, प्राचार्य प्रकाश काळबांडे, व सुधाकरराव भारसाकडे, ज्याला आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुनील वराळे, माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोळ, चित्र डहाणे, सुरेखाताई ठाकरे, तज्ज्ञ संचालक प्रवीण आप्पा काशीकर आदी मान्यवर उपस्थित होते सभेचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here