Home पुणे राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत नागणे तर उपजिल्हाध्यक्षपदी उमेश...

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत नागणे तर उपजिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील नियुक्त

61
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या
पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत नागणे तर उपजिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील नियुक्त
(जीवन सोनवणे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
भोर/जेजुरी-काल शुक्रवार रोजी श्रीक्षेत्र जेजुरी येथे राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाची बैठक अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पुणे जिल्ह्यातील युवा मराठा न्युज नेटवर्कच्या प्रतिनिधीनी हि बैठक जेजुरी शहरातल्या सासवड रोडवरील हाँटेल अहिल्या येथे आयोजीत केलेली होती.या बैठकीस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या बैठकीस महासंघाच्या राष्ट्रीय सचिव श्रीमती आशाताई बच्छाव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.याप्रसंगी युवा मराठाच्या पुणे जिल्हा प्रतिनिधीच्या वतीने राजेंद्र पाटील राऊत व श्रीमती आशाताई बच्छाव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीस मोजकेच पण महत्त्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीतून विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन पुणे जिल्ह्यातील कामकाजाबाबत सडेतोड मार्गदर्शन करण्यात आले.राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत नागणे यांची तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या बैठकीस युवा मराठाचे पत्रकार जीवन सोनवणे,राकेश पाटील,संजय वाघमारे आदीसह बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here