Home बुलढाणा ७५, आझादी का अमृत महोत्सव, निमित्य आज ग्रामीण रुग्णालय वरवट येथे घेण्यात...

७५, आझादी का अमृत महोत्सव, निमित्य आज ग्रामीण रुग्णालय वरवट येथे घेण्यात आला आज ‘भव्य आरोग्य मेळावा ‘

56
0

राजेंद्र पाटील राऊत

७५, आझादी का अमृत महोत्सव, निमित्य आज ग्रामीण रुग्णालय वरवट येथे घेण्यात आला आज
‘भव्य आरोग्य मेळावा ‘                                                             संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

संग्रामपूर तहसील मधील ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे आज जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय ,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच संग्रामपूर तहसील वैद्यकीय अधिकारी यांच्या विद्यमाने आज भव्य आरोग्य मेळावा आयोजित करून या भागातील दुर्धर आजार,उच्य रक्तदाब,मधुमेह,किडनी आजार,दमा, गरोदर स्त्रिया,कुपोषित बालके,इत्यादी आजारांवर बुलढाणा,खामगाव,नांदुरा तसेच शेगाव वरून आलेल्या निरनिराळ्या तज्ञांमार्फत आज दि.२१.०४.२२ रोजी वेळ सकाळी ९ ते दु. ४ पर्यंत तपासणी करण्यात आली. तसेच रक्त लघवी तपासणी तसेच इतर उपचार या आरोग्य मेळाव्यात विनाशुल्क करण्यात आले यामध्ये वेगवेगळ्या गावातील आशा वर्कर यांच्या योगदानाची बरीच मदत वेगवेगळ्या गावामधून नाव नोंदणी द्वारे झालेली होती मेळाव्यात स्थानिक आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या जवळपास २५० ते ३०० रुग्णांनी लाभ घेतला. वरवट येथील अधिकारी मारोडे सर ,सोळंके सर,गोमासे सर, तसेच इतर सर्व अधिकारी तसेच् कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे मेळाव्याला शोभणीय यश आले आणि रुग्णांना चांगल्याप्रकारे लाभ घेता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here