Home नाशिक उमराणेत ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहित्य विक्रीचे उदघाटन

उमराणेत ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहित्य विक्रीचे उदघाटन

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0048.jpg

(भिला आहेर ता.प्र.युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा – येथील जाणता राजा मित्र मंडळा तर्फे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी ना-नफा ना-तोटा या तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
१९ फेब्रुवारी १९९४ साली उमराणे येथे जाणता राजा मित्र मंडळाची स्थापना शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झाली.स्थापने नंतर आजतागायत गेल्या २८ वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.सालाबादा प्रमाणे या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ शालेय विद्यार्थ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ ना-नफा ना-तोटा या तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पि.के.सूर्यवंशी होते.प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष केदा आण्णा देवरे, पुंडलिक गायकवाड, माजी सभापती राजेंद्र देवरे, माजी सरपंच दत्तू देवरे, चेअरमन संदीप देवरे, दत्तू श्रावण देवरे, नितीन काला, संजय ओस्तवाल, प्रल्हाद जामधाडे, सुनील सर, रमेश देवरे, निंबा देवरे, बापु देवरे, जे.डी.देवरे सर, जगन्नाथ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, शिरसाठ, सुर्यवंशी सर यांनी धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या सामाजिक कार्याची माहिती विषद केली.
कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, संतोष देवरे, चिंतामण देवरे, प्रविण देवरे, बाळा पवार, गोरख देवरे, शांताराम देवरे, रामराव देवरे, योगेश देवरे, तात्या देवरे, अनिल देवरे, सुनील देवरे, पप्पु पवार, किशोर सोनवणे, आबा देवरे, योगेश सावंत, भुषण देवरे, जिभाऊ देवरे, भाऊसाहेब पाटील, दत्ता जाधव, अनिल जाधव, काका देवरे, किरण देवरे, विकी देवरे, शिवराजे देवरे, सागर देवरे, शंभू देवरे, सचिन देवरे, अभिषेक देवरे, राकेश देवरे, वैभव देवरे, तात्या गायकवाड, बंटी गायकवाड, गंडू देवरे, सुजन देवरे, अमित देवरे, दादू देवरे, हर्षवर्धन सावंत, खुशाल देवरे, अमोल देवरे, जयंत पवार, अंकुर देवरे, दिपक देवरे, भैया गायकवाड, निखील देवरे, पप्पू शेंख, आबा आहिरे, हितेश बाफना, नाना वतनदार, अरुण पेंटर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here