Home जालना अ.भा.अग्रवाल सम्मेलनतर्फे पिण्याच्या पाण्याची टँकरव्दारे व्यवस्था!

अ.भा.अग्रवाल सम्मेलनतर्फे पिण्याच्या पाण्याची टँकरव्दारे व्यवस्था!

16
0

Yuva maratha news

1000315231.jpg

अ.भा.अग्रवाल सम्मेलनतर्फे पिण्याच्या पाण्याची टँकरव्दारे व्यवस्था!
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरचा पाणीपुरवठा शुद्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य व स्वच्छता-पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. ज्या ठिकाणी टँकर भरला जातो, त्या पाणीस्त्रोतांची तसेच गावात टँकर दाखल झाल्यानंतर टँकरच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय या विभागांनी घेतला आहे. त्यानुसार देऊळगांवराजा रोड, पानशेंद्रा, जामवाडी, श्रीकृष्णनगर, दर्शननगर आणि गणेश रेसीडेंसी या प्रभागात अ. भा. अग्रवाल सम्मेलनतर्फे मोफत पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे. या कामी अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनाचे महाराष्ट्र सचिव जितेंद्र अग्रवाल, जालना शाखेचे अध्यक्ष दिलीप अग्रवाल, सचिन भारूका, गिरीश अग्रवाल, सचिन जयपुरिया आणि कैलाश भरतीया उपस्थित होते. हे कार्य 15 जूनपर्यत सुरु राहणार असून उपरोक्त सर्व ठिकाणी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नियोजनाच्या अभावामुळे आणि पुरवठा यंत्रणेतील त्रुटींमुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता महागड्या टँकरचीही झळ बसत असल्याचे दिसून आल्यानंतर हा मोफत टँकरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नळाला अर्धा तास येणारे पाणीदेखील गरजेपुरते मिळत नसल्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा प्रशासनाने पाणीसाठा कमी असताना यातील पाणी टँकरद्वारे शहराला दिले जात आहे. मात्र दहा हजार लिटर पाण्याच्या टँकरची किंमत अवघी दोनशे रुपये असल्याने हा टँकर सहज खरेदी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here