Home नाशिक जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी व लालबहादूर...

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

150

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0035.jpg

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी                                            (अरुण शिरोळे जिल्हा विशेष प्रतिनिधी)

काल दिनांक २/१०/२०२३ रोजी जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमापूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य श्री सत्यम साहेबराव चव्हाण यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी महात्मा गांधीजींचे व लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यसंग्रामाकरिता केलेल्या कार्याची माहिती करून दिली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती वाघ एस आर व श्री सरोदे एस एन यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजींचे व लालबहादूर शास्त्री यांचे शिक्षणाबद्दल असलेले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निकम जे एस यांनी केले. तसेच या प्रसंगी सर्वांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत गावातील परिसर स्वच्छ केला या प्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री ठाकरे सतीश कुमार उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री अरुण वाघ गावाचे सरपंच श्रीमती प्रतिभा अरुण वाघ उपसरपंच श्री रामराव नामदेव ठाकरे ग्रामसेविका श्रीमती पाटील व्हि डी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता ही सेवा ही शपथ घेतली आलेल्या पाहुण्यांचे आभार ज्येष्ठ शिक्षक श्री सरोदे एस एन यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Previous articleराजबाई शेवाळीच्या शाळेत अवतरले गांधीजी
Next articleअडोळी येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला  कंटाळले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.