Home वाशिम अडोळी येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला  कंटाळले

अडोळी येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला  कंटाळले

116
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231003-101818_WhatsApp.jpg

अडोळी येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला  कंटाळले

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)
वाशिम जिल्ह्यातील आडोळी या गावातील बंडू रामकिसन इढोळे या शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन व संत्रा पिकाचे अतोनात झाले असून वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे खूपच नुकसान झाले याबाबत वन विभागाला वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना स्वाभिमानीच्या माध्यमातून केल्या परंतु वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त अद्याप झाला नसल्याने आडोळी गावातील व परिसरातील शेतकरी खूपच त्रस्त झाले आहे. असेच नुकसान प्रत्येक वेळी झाल्यास शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे शेतकऱ्याकडे शासन व वन विभाग जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत शेतकरी हवालदिल होणार आहे. वनविभागाने बंडू रामकिसन डोळे या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीचे सतीश इढोळे, राम इढोळे यांनी केली आहे जर याबाबतची दखल घेतली नाही तर स्वाभिमानी संघटनेची शेतकरी संघटनेशी गाठ आहे. असा इशारा दिला आहे. याबाबत लवकरच दाखल वन विभाग घेईल व शेतकऱ्याला आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here