Home मुंबई शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ८० वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ८० वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात

174
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ८० वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.७ – पंजाब चे शेतकरी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरले आहेत.जवळपास लाखभर ट्रॅक्टर आणि करोडो शेतकरी बांधव दिल्लीच्या आसपास ठाण मांडून बसले आहेत.आता या बांधवांच्या हित रक्षणासाठी पवार साहेब देखील सरसावले आहेत.
पवार साहेबांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की,

“सर्वात जास्त शेती आणि देशातील नागरिकांना होणाऱ्या अन्नपुरवठ्याबाबत विचार केला तर सर्वात जास्त योगदान पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात हे राज्य देशाची तर गरज भागवतातच, यासोबत आणखीन १७ ते १८ देशांना पुरवायचं काम हा देश करतोय ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी जेंव्हा रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी.”

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “केंद्राने मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे असं दिसत नाही. असंच जर राहिलं तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही आणि देशातील कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे सरकारने आतातरी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here